योजना क्र.२ :- दिव्यांगांना स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य योजना

योजना माहिती

अनेक दिव्यांग व्यक्ती् बर्‍याचवेळा दिव्यांगत्वामुळे अथवा बिकट परिस्थीतीमुळे स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकत नाही किंवा शारिरीक मर्यादेमुळे नोकरी करु शकत नाही तसेच दिव्यांगाकरीता उपलब्ध असणाऱ्या नोकर्यां चे प्रमाण अत्यल्प आहे. अशावेळी एखाद्या लघुउद्योग सुरु करुन दिव्यांग व्यक्ती् स्वतःचा व कुटूंबाचा उदरनिर्वाह करु शकतात. परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे किंवा विविध कारणांमुळे त्यांना भांडवल उभे करणे अशक्य असते. याकरणास्तव अशा दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता आर्थिक सहाय्य अंतर्गत नाशिक मनपा क्षेत्रातील प्रत्येक पात्र अर्जदारास रुपये १,००,०००/- (अक्षरी एक लक्ष रुपये मात्र) चे मर्यादेत आर्थिक सहाय्य मंजुर करण्यात यावे.

अधिक माहिती व अटी-शर्ती साठी येथे क्लिक करा