योजना क्र.१० :- दिव्यांग खेळाडू ज्यांनी क्रिडा स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेले आहेत किंवा जे खेळाडू विविध क्रिडा स्पर्धाकरिता परदेशात होणाऱ्या क्रिडा स्पर्धेसाठी सहभाग नोंदवू इच्छितात अशा दिव्यांग खेळाडूंना अर्थसहाय्य योजना

योजना माहिती

समाजात प्रत्येक व्यक्तीे संपूर्ण स्वालंबी असावी ही मुलभूत संकल्पना आहे पंरतू नैसर्गिकरित्या आलेल्या शारीरीक मर्यादा व एक विशिष्ठ मर्यादापलिकडे न येणारे स्वालंबत्व यामुळे कित्येक व्यक्तींरना समाजामध्ये दुसर्या व्यक्तींवर अवलंबून रहावे लागते. मुख्यत: जे दिव्यांग खेळाडू क्रिडा स्पर्धामध्ये सहभाग नोंदवून त्यांचे अपंगात्वर मात करत विविध खेळांमध्ये जिल्हास्तरीय,राज्यस्तरीय,राष्ट्रीय,अंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्राविण्य मिळविलेले आहेत तसेच काही खेळाडू विविध क्रिडा स्पर्धामध्ये सहभाग नोंदविण्यासाठी परदेशामध्ये अंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवित असतात अशा खेळाडूंना प्रोत्साहित करणे आवश्यपक आहे. तसेच अशा दिव्यांग खेळाडूंची आर्थिक परिस्थिती देखील हालाखीची असते पैसे अभावी विविध क्रिडा स्पर्धेमध्ये त्यांना सहभाग नोंदवून विशेष प्राविण्य मिळविणेकामी अडचण निर्माण होत असतात याकरिता त्यांना आर्थिक सहाय्य देऊन प्रोत्साहित करणे आवश्यक वाटते. त्याकरिता अशा खेळाडूंना खालील अटीकशार्तीवर विशेष अर्थसहाय्य देणेबाबत प्रस्तावित करणेंत येत आहे.

अ.क्र. प्रावीण्य वार्षिक क्रीडा शिष्यवृत्ती रक्कम रु.
आंतरराष्ट्रीय स्तर राष्ट्रीय स्तर राज्य स्तर
प्रथम क्रमांक १,००,०००/- २५,०००/- १०,०००/-
द्वितीय क्रमांक ७५,०००/- २०,०००/- ७०००/-
तृतीय क्रमांक ५०,०००/- १५,०००/- ५०००/-
मान्यता प्राप्त अधिकृत अंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागाकरिता प्रत्यक्ष येणारा किवा तीन लक्ष यापैको जी रक्कम कमी असेल

अधिक माहिती व अटी-शर्ती साठी येथे क्लिक करा