योजना क्र.६ :- दिव्यांगांना सहाय्यभुत साधने व तंत्रज्ञान याकरीता अर्थसहाय्य.

योजना माहिती

दिव्यांग व्यक्तींरना त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करुन त्यांचे आयुष्य स्वावलंबी बनविण्याकरीता चलनवलन साहित्यांची नितांत आवश्यकता असते. त्यामध्ये प्रामुख्याने खालील तक्त्यात नमुद केल्याप्रमाणे साधनांचा समावेश आहे. परंतु उत्तम दर्जाचे चलनवलन साहित्य व सहाय्यक उपकरणे आर्थिक दृष्टया दिव्यांग व्यक्तीं ना परवडत नाहीत. याकरीता उपरोक्तव साहित्य खरेदी करण्याकरीता खाली नमुद केल्यानुसार आर्थिक सहाय्य मंजुर करण्यात यावे. या बाबींचा विचार करता दिव्यांगांकरीता सहाय्यभुत साधने व तंत्रज्ञान याकरीता अर्थसहाय्य योजना राबविण्यात यावी.

  • १. अंध व्यक्तींसाठी संगणक (जॉस सॉप्टवेअर), ब्रेल नोट वेअर, Communcation equipment Braille attachment telephone,adapeted walkers ब्रेले लेख साहित्य, ब्रेल टाईपरायटर, टॉकींग टाईपरायटर, लार्ज प्रिंट बुक, अल्पदृष्टी अपंगत्वावर मात करणेसाठी Digital magnifiers Smart Cane इत्यादी
  • २. कर्णबधिर व्यक्तींसाठीः विविध प्रकारची वैयक्तीतक श्रवणयंत्रे (बीटीईसह), शैक्षणिक संच, संवेदन उपकरणे, संगणकासाठीचे सहाय्यभूत उपकरणे.
  • ३. अस्थिव्यंग व्यक्तींसाठी: Adopted Scutoor कॅलीपर्स, व्हीलचेअर, तीनचाकी सायकल, स्वयंचलीत तीन चाकी सायकल, कुबडया, कृत्रीम अवयव, प्रोस्थोटिक अँण्ड नील वॉकी ब्रेस, डिव्हायसेस फॉर डेली लिव्हींग.
  • ४. मतिमंद व्यक्तींसाठी: मतिमंदासाठी शैक्षणिक साहित्य (MR Kits), बुध्दीमत्ता चाचणी संच, सहाय्यभूत उपकरणे व साधने तसेच तज्ञाने शिफारस केलेली अन्य सहाय्यभूत साधने.
  • ५. बहुविकलांग व्यक्तींसाठी: संबधित क्षेत्रातील तज्ञाने शिफारस केलेली सुयोग्य सहाय्यभूत साधने व उपकरणे, सी.पी.चेअर, स्वयंचलित सायकल व खुर्ची, संगणक वापरण्यासाठीची सहाय्यभूत उपकरणे.
  • ६. कुष्ठरोग मुक्त दिव्यांग व्यक्ती: कुष्ठरोगमुक्त दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव व साधने, सर्जीकल अण्ड करेक्टीव्ह फूटवेअर्स, सर्जीकल अप्लायंसेस, मोबिलिटी एड इ.

उपरोक्त नमूद केलेल्या साहित्य किंवा त्याऐवजी इतर दिव्यांग सहाय्यभुत साधने व तंत्रज्ञानाकरीता कमाल रु. ४०,०००/- (अक्षरी चाळीस हजार रुपये मात्र) पर्यंत अर्थसहाय्य मंजुर करण्यात यावे.

अधिक माहिती व अटी-शर्ती साठी येथे क्लिक करा