योजना क्र.१ :- कर्णबधिरांना Cochler Implant शस्त्रक्रियेकरिता अर्थसहाय्य योजना.

योजना माहिती

कर्णबधिरत्व /कर्णदोष हे भाषावाढीसाठी व वाचा विकासासाठी अत्यंत अडचणीचे ठरते. भाषा व वाचा विकासासाठी बुद्धीइतकीच निरोगी कर्णेद्रियांची गरज असते. जन्मतः कर्णबधिर असलेली मुले त्यांचे आजूबाजूच्या वातावरणातील तसेच बोलण्याचा आवाज ऐकवू न आल्यामुळे बोलू शकत नाहीत.त्यायोगे त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य च भावनिक नुकसान होते. खरेतर योग्य पेळेत म्हणजेच जन्मानंतर लगेच शक्य् तितक्या लवकर वयाने (वय ० ते ३ वर्षे) निदान करून त्यांच्या कानावर Cochler Implant सारखी शस्त्रक्रिया केल्यास आणि त्यासोबत ऐकण्या-बोलण्याचे प्रशिक्षण दिल्यास कर्णबधिर मुले इतर ऐकू येणा-या मुलांसारखेच शालेय शिक्षण घेऊ शकतात. सर्वसामान्य मुलासारखे बोलू शकतात. श्रवणदोष हा वेगवेगळ्या तीव्रतेचा असून जन्मतःच कर्णबधिरत्व आलेल्या मुलांना तीव्र ते अतितीव्र प्रमाणात कर्णबधिरत्व आलेले असते. अशावेळी श्रवणयंत्र वापरणे पुरेसे ठरत नाही. अशावेळी Cochler Implant Surgery केल्यास त्यांना इतर मुलांइतकेच ऐकू येवू शकते. Cochler Implant हे ऑपरेशन करून आंतरकर्णाच्या हाडाच्या पोकळीपर्यंत सोडले जाते. तेथे बाहेरच्या आवाजाचे इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये रूपांतर करून नसे पर्यंत आवाज पोहोचविते. त्या योगे मुले नेहमीसारखे ऐकू शकतात व श्रवणत्वाच्या प्रशिक्षणायोगे मुलांचा भाषा-वाचा विकास अधिक सोपा होतो. सदरची शस्त्रक्रिया करताना कर्णबधिरत्वाबाबतच्या योग्य त्या चाचण्या करूनच शस्त्रक्रिया होत असते. शस्त्रक्रियेसाठी एका रूग्णास किमान ७ ते १० लाख रूपये खर्च अपेक्षित असतो. याव्यतिरिक्त औषधोपचार, थेरपि, प्रशिक्षण व इतर चाचण्यांकरिता हा आवर्ती खर्च पालकांना करावा लागत असतो. ही खर्चिक शस्त्रक्रिया असल्यामुळे ब-याचदा कर्णबधिर व्यक्तींाना त्यापासून वंचित रहावे लागते व त्याचा भाषा-वाचा विकास व शैक्षणिक विकास खुंटतो. सदरची बाब लक्षात घेता कर्णबधिरांना Cochler Implant सर्जरीसाठी आर्थिक सहाय्य देणे किंवा Cochler Implant Speech Processor outer device करिता आर्थिक सहाय्य अंतर्गत प्रत्येक पात्र अर्जदारास रुपये ३,००,०००/-(अक्षरी तीन लाख रुपये मात्र) तसेच Mapping,औषधोपचार, थेरपि, प्रशिक्षण व इतर चाचण्यांकरिता रुपये ५० हजार (अक्षरी पन्नास हजार रुपये मात्र) असे, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील पात्र कर्णबधिर अर्जदारास (लहानात लहान कर्णबधिर मुलास प्रथम प्राधान्य देऊन) आर्थिक सहाय्य मंजुर करण्यात यावे.

अधिक माहिती व अटी-शर्ती साठी येथे क्लिक करा