योजना क्र.९ :- मतिमंद/मेंदू पिडीत तसेच बहुविकलांग जे ७० ते १०० टक्के दिव्यांग आहेत व पूर्णत: अंथरुणास खिळून आहेत अशा दिव्यांग व्यक्तींना अर्थसहाय्य योजना

योजना माहिती

समाजातील प्रत्येक व्यक्ती संपूर्ण स्वालंबी असावी ही मुलभूत संकल्पना आहे पंरतू नैसर्गिकरित्या आलेल्या शारीरीक मर्यादा व एक विश्षिष्ठ मर्यादापलिकडे न येणाऱ्या स्वालंबत्व यामुळे कित्येक व्यक्तींशना समाजामध्ये दुसऱ्या व्यक्तींवर अवलंबून रहावे लागते. मुख्यत: मतिमंद/मेंदू पिडीत तसेच बहुविकलांग ७० ते १०० टक्केस दिव्यांग असलेल्या व्यक्तींकना नैसर्गिक मर्यादामुळे अथक प्रयत्नानंतरही स्वत:चे चरित्रार्थ चालविण्याकरिता असमर्थ ठरतात अशा व्यक्तीं ना स्वयंम रोजगारही करता येत नाही किंवा नोकरीही करु शकत नाही. त्यांना त्यांचे स्वत:चे कामे देखील स्वत:ला करता येत नाही अशा दिव्यांग व्यक्तींचा विचार करता अशा प्रकारे दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींवना प्रतिमहा र.रु.२०००/- याप्रमाणे प्रति वर्षे र.रु.२४,०००/- आर्थिक सहाय्य देण्याची योजना लागू करणेत येत आहे .

अधिक माहिती व अटी-शर्ती साठी येथे क्लिक करा