योजना क्र.४ :- दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांकरिता शिक्षण / प्रशिक्षणाकरीता अर्थसहाय्य योजना.

योजना माहिती

शाळांमध्ये विशेष विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकविताना विशेष पद्धतींचा अवलंब करावा लागतो. अशा विशेष पद्धतींचा अवलंब विदयार्थ्यांच्या दैनंदिन व्यवहारात केल्यावरच त्यांचा विकास होऊ शकतो. दिव्यांग मुलांच्या संपूर्ण पुनर्वसनाकरिता पालक, विशेष शिक्षक, थेरपिस्ट (विशेष तज्ञ), समाज या सर्वांचाच सहभाग असावा लागतो. त्यातूनही विशेष मुलाच्या शिक्षणामध्ये पालकांची भुमिका सर्वात महत्वाची असते. पालकांनी आपल्या विशेष पाल्याच्या समस्या समजून घेणे, त्याच्या गरजा लक्षात घेणे व शालेय शिक्षणाचे अभ्यासपूर्वक निरिक्षण करून या विशेष पद्धतीं आत्मसात करणे आणि आपल्या पाल्याच्या दैनंदिन व्यवहारात त्याचा उपयोग करणे महत्वपूर्ण असते. या हेतूने शिक्षकांनी ठरवून दिलेल्या वेळेत पालकांनी सलग व टप्प्याटप्प्याने विविध शिक्षण व प्रशिक्षणाच्या उपक्रमांना, कार्यशाळांना उपस्थित राहणे आवश्यक आहे. दिव्यांग क्षेत्रात काम करणा-या मान्यताप्राप्त शाळा, संस्था, राष्ट्रीय संस्थांचे दिव्यांग मुलांचे शिक्षण व पुनर्वसन यावर आधारित प्रशिक्षण आयोजित केलेल्या विविध कार्यशाळेस विशेष मुलांच्या पालकांनी उपस्थित राहून ज्ञान ग्रहण करणे आवश्यक आहे. सदरील आर्थिक सहाय्य मिळविण्याकरता पालकांनी दिव्यांग शिक्षण संबधित कार्यशाळेस उपस्थित राहणे, विशेष शाळेत वर्गनिरीक्षणासाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. एका पालकाला वर्षभरात कितीही वेळा वर्ग निरीक्षण व कार्यशाळेत उपस्थित राहता येईल तसेच एक किंवा अधिक प्रशिक्षण कार्यक्रमांत पालकांना सहभाग घेता येईल.

अ.क्र लाभार्थी रक्कम रुपये
वर्ग/ सत्र निरीक्षणाकरीता रु१००/- प्रतिदिन (आठवडयातून कमाल ४ दिवस)
कार्यशाळेकरिता कमाल रु. ५०००- (प्रति कार्यशाळा)
दिव्यांगावर निगडीत असलेल्या शिक्षणा करीता (डी.एड/बी.एड./एम.एड./पीएच.डी.इ.समकक्ष शिक्षण तथा दिव्यांगांसंबंधित १ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचे अभ्यासक्रम) कमाल रु. ५०,०००/- (प्रति अभ्यासक्रम)

अधिक माहिती व अटी-शर्ती साठी येथे क्लिक करा