योजना क्र.8 :- नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था/संघटनांचे सक्षमीकरण करणे

योजना माहिती

अपंगासाठी किमान ३% निधी योग्य प्रयोजनार्थ खर्च कशा प्रकारे करण्यात यावा याकरीता नगर विकास विभाग यांचा शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०१५/प्र.क्र.११८/नवि-२०, दिनांक २८/१०/२०१५ व ग्राम विकास विभाग यांचा शासन निर्णय क्र.अपंग २०१५/प्र.क्र.१३७/वित्त-३,दि.२४/११/२०१५ नुसार स्थानिक स्वराज्य संस्थानी अपंग व्यक्तीं करीता राखून ठेवण्यात आलेल्या ३% निधी मधून अपंग हिताच्या कोणकोणत्या योजना राबविण्यात याव्यात याबाबत मार्गदर्शक सुचना निर्गमीत करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार संबधित समित्यांना सामुहीक योजनांतर्गत खालील बाबी सुचित करण्यात आलेले आहेत.

  • १. दिव्यांग महिला बचत /स्वयंसहायता गटांना सहायक अनुदान देणे.
  • २. सर्व प्रवर्गाच्या अतितीव्र दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींसाठी तात्पुरत्या अथवा कायम स्वरुपाचा निवारागृहाला सहायक अनुदान देणे.
  • ३. लवकरात लवकर त्वरीत उचाराच्या दृष्टीने अपंगांच्या पुर्व प्राथमिक शिक्षणाची (Early Detection & Intervention Center) सुविधा पुरविण्याऱ्या संस्थाना अर्थसहाय उपलब्ध करुन देणे.
  • ४. दिव्यांग व्यक्तीं ना समुपदेशन तसेच सल्लामसलत करणाऱ्या केंद्राना सहायक अनुदान देणे.
  • ५. दिव्यांग मुलांकरीता विशेष शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा उपलब्ध करुन देणार्या संस्थाना सहाय्यक अनुदान उपलब्ध करुन देणे.
  • ६. दिव्यांग मुलांच्या पालक संघाना/ संघटनांना सहायक अनुदान देणे.

दिव्यांग संस्था/ पालक संघटना यांना लागणाऱ्या सहाय्यक अनुदानाबाबत सविस्तर प्रस्ताव नाशिक महानगरपालिका केंद्राकडे सादर करण्यात यावा. सदरच्या प्रस्तावावर मा. आयुक्ते सो यांच्या मार्गदर्शनाखाली नियमावली तयार करुन पात्र अथवा अपात्र करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात येत असते. तसेच प्रतिवर्ष अंदाजपत्रकीय तरतूदीच्या अधिन राहून मर्यादित संस्था/ संघटनांना अनुदान देण्याचे अधिकार मा. आयुक्त् सो यांच्याकडे राखून ठेवण्यात येत आहेत.

अधिक माहिती व अटी-शर्ती साठी येथे क्लिक करा